प्रथमच अंतिम फेरी गाठण्यासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक! उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाशी सामना 

The ultimate comparison

By: gamingpur

महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश येत असल्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर ‘चोकर्स’ असा शिक्का लावला जातो. आता हाच शिक्का पुसण्याचे दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर आव्हान असून एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज, गुरुवारी त्यांचा पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. 

यजमान भारतीय संघाइतकेच सातत्य दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या वेळी दाखवले आहे. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडणे आफ्रिकेला इतके सहज जाणार नाही. 

विश्वचषक आणि विजेतेपद हे ऑस्ट्रेलियासाठी समीकरण होऊन बसले आहे. आतापर्यंतच्या १२ पैकी ५ स्पर्धामध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजेता ठरला आहे.